कळंब |
अखेर नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाले आहे. नगरसेवक पदांच्या आरक्षणाने अनेकांच्या राजकीय गणितात उलथापालथ झाली आहे.
कळंब नगरपालिकेच्या सभागृहात सोडत कार्यक्रम पार पडला. उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी पिठासन अधिकारी म्हणून काम पाहिले, तर मुख्याधिकारी मंजुषा गुरमे या सहायक पिठासन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. लहान मुलांच्या हातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या, यामुळे कार्यक्रमाला औपचारिक पण लोकशाही स्वरूप लाभले.
आरक्षण सोडतीत काही प्रभागांमध्ये मोठे बदल झाल्याने काही दिग्गजांचे गणित बिघडले, तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. काही प्रभाग महिला आरक्षणात गेल्याने पुरुष नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे, तर काही ठिकाणी महिला नेत्यांनी तयारीला वेग दिला आहे.
यंदा नगरपालिकेत १० पुरुष आणि १० महिला असे एकूण २० नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे आता पक्षांच्या तंबूत उमेदवारांची चाचपणी, गणितं आणि चर्चांना वेग आला असून, कळंबच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत.
प्रभाग क्रमांक १
अ –  सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २
अ – ना.मा.प्र महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
अ – अनुसुचीत जाती महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
अ – अनुसुचीत जाती
ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ५
अ – ना.मा.प्र पुरुष
ब -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ६
अ –  नामाप्र पुरुष
ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ७
अ – नामाप्र महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९ 
अ – नामाप्र महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
अ – अनुसुचीत जमाती महिला
ब – सर्वसाधारण
			










