प्रतिनिधी कळंब:- हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार सरकार असुन केवळ फसव्या घोषणा व विकास कामांना स्थगीती देवुन अडवणुक करणार स्थगीती सरकार असल्याचा घनाघात उमेदवार कैलास पाटील यांनी केला .
महाविकास आघाडी चे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा बलाई मंगल कार्यालयात पार पडला उमेदवार कैलास पाटील माजी आ दयानंद गायकवाड काँग्रेस चे नेते विश्वास शिंदे काँग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर भापसेचे प्रदेशाध्यक्ष दिपक ताटे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद सस्ते प्रदिप मेटे विश्वजीत जाधव दिलीप पाटील सौ कांचनमाला संगवे रूक्सना बागवाण रामलींग आवाड मुसद्दीक काझी भागवतराव धस बळवंत तांबारे हानुमंत आवाड प्रा संजय कांबळे बालाजी जाधवर बापुराव शेळके आदि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते
हि लड़ाई एकनिष्ठतेची आणी सत्याची आहे त्या मुळे तन मनाने सर्व जण काम करतात म्हणुन कैलास पाटील यांच्या एकनिष्ठतेचा विजय निश्चित आहे. एक लाखाची लीड घेउन ते विजयी होतील असा विश्वास कांचनमाला संगवे यांनी व्यक्त केला . या वेळी काँग्रेस नेते विश्वास शिंदे यांनी एकीकडे खोक्याला लाथ मारून सर्वांशी एकनिष्ठ राहणारे . कैलास पाटील कुठे तर समोरील उमेदवार आज या पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात उडी मारून आलेले आहेत जनता हुशार आहे त्यामुळे एकदिलाने काम करून महाविकास आघाडीच्या कैलास पाटील यांना विजयी करा असे आवाहन केले .
तर उमेदवार आ कैलास पाटील यांनी पुढे मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले की या सरकारन कळंब मोहा येडशी हासेगाव ईटकुर पारा रस्त्याच्या मंजुर कामांना स्थगीती दिल्याने अनेकांचे जीव गेले परंतु आपण न्यायालयात जावुन हि स्थगीती उठवली आता हि कामे लवकर पूर्ण होतील तसेच बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजेस मधे करण्यासाठी प्रयत्न केले पण गद्दारीत सामील न झाल्याने हि कामे अडवली . आता जनतेनी त्यांना याचा ज्वाब विचारावा असेही ते म्हणाले .
शिवसेना पदाधिकार्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सन्मानपुर्वक वागणुक देवुन सोबत घेउन हा विजय मिळवायचा आहे . या पुढे खासदार आमदार ग्रामपंचायत पर्यंतच्या सर्व निवडणुका आपण तिन्ही पक्षांना सोबत घेउन लडवायच्या आहेत महाविकास आघाडी एकत्रीत निवडणुक लडल्यास कळंब बाजार समिती सारखा विजय मिळतो हे गणीत पक्क आहे . हे सरकार केवळ घोषणाचा पाऊस पाडणार सरकार आहे .
मुख्यमंञ्याच्या पक्षातुन आज शिवसेनेत आलेल्या सागर मुंडे सह नगरसेवकांचे कौतुक करत त्यालाही वाघाच काळीज लागत असे म्हणत तुम्हाला सोबत घेउन आपण सर्वजण मिळुन शहर व तालुक्याचा विकास करू असा शब्द कैलास पाटील यांनी शिंदे गटातील ‘कार्यकत्यांना दिला
महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख आ कैलास पाटील यांच्या उपस्थीतीत शिंदे गटातील माजी नगराध्यक्ष पती सागर मुंडे सह नंदुदादा हौसलमल बाबुसेठ बागरेचा शंकर वाघमारे शकील काझी महेश पुरी किरण पाणढवळे (माजी नगरसेवक ) अभिषेक मुंडे लाखन गायकवाड सचीन सौलाखे डॉ गोविंद जोगदंड रोहन हौसलमल सह १५०कार्यकर्त्यानी आज सागर मुंडे .च्या नेत्रत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला या त्यांच्या प्रवेशाने कळंब शहरात शिंदे गटाला मोठे खींडार पडले असुन शिवसेनेचा गड आणखी मजबुत झाला आहे .